‘प्रेमगाठ’ ही आधीच बांधलेली असते असं म्हणतात. मग ती जुळायची तशी जुळते आणि फुलतेही. क्रिकेटच्या साथीने फुलणाऱ्या प्रेमाचा असाच ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फ्रि हिट दणका’ या चित्रपटातून उघडेवाडी आणि निगडेवाडी या दोन गावातील संघर्ष पहायला मिळणार आहे. या दोन गावात वैर आहे. दोन गावात लग्न व्यवहार होत नाही. अशावेळी या दोन गावातील प्रियकर आणि प्रेयसीची जोडी लग्नासाठी उत्सुक आहे. याचा फैसला दोन गावाच्या संघातील क्रिकेटच्या सामन्यातून होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोरंजक विषय असलेल्या या चित्रपटात प्रेमाचा सामना कसा रंगणार? आणि या सामन्याचा विजेता नक्की कोण ठरणार? या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नायक आणि नायिकेच्या प्रेमाचा विजय होणार का? या सगळयाची धमाल म्हणजे ‘फ्रि हिट दणका’ हा चित्रपट. ‘सैराट’ चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज शेख (सल्या) आणि तानाजी गालगुंडे (लंगड्या), यांच्यासोबत फँड्री फेम सोमनाथ अवघडे, अपूर्वा एस, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

आणखी वाचा : “नाटकी कलाकारांची झुंडशाही…”, मराठी कलाकारांना महेश टिळेकरांचा टोला

आणखी वाचा : जिनिलिया माहेरी जाणार ऐकताच, रितेश देशमुखने गायलं हे गाणं; Video पाहून हसू आवरणार नाही

क्रिकेट आणि प्रेमाची एकत्र मेजवानी असलेला ‘फ्रि हिट दणका’ झी टॉकीजवर अनुभवता येणार आहे. झी टॉकीजवर रविवारी १३ मार्चला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. रंगणारा क्रिकेट आणि प्रेमाचा हा ‘फ्रि हिट दणका’ चुकवू नका.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free hit danka world televisoin premium dcp