दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे म्हणणे आहे की, त्याचा आगामी चित्रपट ‘फ्रिडम’ म्हणजे ‘दिल चाहता है’ आणि ‘दीवार’ यांचे एकत्रित रूप आहे. हा चित्रपट एक राजकीय थ्रिलर असून, १९८४ ते २००० सालापर्यंतच्या वेगवेगळ्या काळावर तो आधारलेला आहे. हा चित्रपट म्हणजे निव्वळ व्यंगात्मक चित्रिकरण नसून, तो एक ड्रामा आहे. चित्रपटाची कहाणी उदारीकरणानंतरच्या काळावर आधारित असून, यात तीन तरूणांच्या जीवनाचा प्रवास दर्शविला आहे. देशातील प्रतिभावान, बुद्धिवान आणि सक्षम तरूणांमध्ये उदारीकरणानंतर झालेले बदल या चित्रपटात दर्शविण्यात आले आहेत.
या चित्रपटात वडील आणि मुलगा यांच्यातील नातेसंबंधांबरोबरच मित्रांमधील नातेसंबंध दाखविण्यात आले आहेत. चित्रपटाची कहाणी तीन महत्वाकांक्षी तरुणांची आहे. त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी घरातील मंडळी आणि समाजकडून त्यांना कशाप्रकारे योगदान मिळते ते यात दाखविण्यात आले आहे. अग्निहोत्रीच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट म्हणजे अशा अनेक घटनांचे सार आहे ज्या भारतात कुठे ना कुठे घडलेल्या आहेत अथवा त्यानी स्वतः प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत.
या आधी अग्निहोत्री यांनी ‘हेट स्टोरी’ आणि ‘लकिली’ हे दोन चित्रपट बनवले होते, ज्यांना फारसे यश मिळाले नव्हते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा