करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोची हळूहळू चर्चा वाढत आहे. या शोच्या ४ थ्या पर्वाची सुरूवात सलमान खानबरोबर करणच्या बहुचर्चित गप्पांनी झाली. आता करणने त्याच्या गेस्ट-लिस्टमधील दोन नवीन अभिनेत्रींची नावे प्रसिध्द केली आहेत. ‘मद्रास कॅफे’ची हिरोइन नर्गिस फाखरी आणि हॉलिवूड दिवा फ्रेडा पिंन्टोने नुकतेच या शोसाठीचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. करणने या दोघींचे शोमधील छायाचित्र संदेशासह िट्वटरवर पोस्ट केले आहे. तो म्हणतो – फ्रेडा पिंन्टो आणि नर्गिस फाखरी या मस्तीखोर मुलींबरोबरचा सर्वात ऐतिहासिक कॉफी एपिसोड नुकताच शूट केला!!!
‘कॉफि विथ करण’ शोमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी धमाल मस्ती केली. या स्टायलिश अभिनेत्रींचा डोक्यावर कॉफी कप ठेवलेला काऊचवरचा फोटो करणने िट्वट केला आहे. १ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या शोच्या पुढील भागात करिना कपूर आणि रणबीर हे बहिण-भाऊ दिसणार आहेत.

Story img Loader