ब्रुनो मार्स याच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या ‘गोरिल्ला’ या म्युझिक व्हिडिओमध्ये भारतीय वंशाची अभिनेत्री फ्रिडा पिंटो हिचा मादक अंदाज तिच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे.
‘स्लमडॉग मिलेनियर’मध्ये सोज्वळ भूमिकेत दिसलेल्या फ्रिडाने या म्युझिक अल्बममध्ये इसाबेला नामक अतिशय बोल्ड अशा स्ट्रिपरची भूमिका साकारली आहे.
सहा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये फ्रिडा पिंटो आपल्या मादक अदांनी पोलवर नृत्य करताना दिसते. लोकांच्या कामुक भावना जागवणयासाठी आवश्यक ती मेहनतही तिने आपल्या शरीरयष्टीवर घेतली असून पोल डान्सचेही तंत्र अतिशय उत्तमरित्या आत्मसात केल्याचे दिसत आहे.
फ्रिडा पिंटोच्या या पोल डान्स व्हिडिओने रिहानाचा नुकताच बाजारात आलेला ‘पोअर इट अप’ या व्हिडिओसमोरही आव्हान उभे केले आहे.
ब्रुनो मार्स आणि फिलिप लॉरेन्स यांनी मिळून हे गाणे लिहिले असून म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शनही ब्रुनोने केले आहे.
याच व्हिडिओमध्ये पोल डान्ससोबत फ्रिडा पिंटो आणि ब्रुनो मार्स यांच्यावर एका कारच्या मागच्या सीटवर अतिशय हॉट सीनही चित्रित करण्यात आले आहेत.