मैत्रीवर आधारित अनेक सिनेमे मराठीत येऊन गेलेत. प्रत्येक सिनेमात मैत्रीची वेगवेगळी रूपे बघायला मिळाली. आता आणखी एक दोन मित्रांची आगळीवेगळी कथा असलेला ‘फ्रेंड्स’ हा सिनेमा येऊ घातला आहे. ज्यात तुम्हाला दोन मित्रांची धमाल-मस्ती, मजा बघायला मिळणार आहे. मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि सचीत पाटील हे दोघे यात मुख्य भूमिकेत आहेत. दोन मोठे स्टार एकत्र बघायला मिळणार या गोष्टीनेच सध्या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये जोरदार उत्सुकता बघायला मिळत आहे.
मित्र हे असं व्यक्तीमत्व आहे जे प्रत्येकाच्याच जीवनात असतं. मैत्री प्रत्येकाला जगण्याचा एक वेगळा अर्थ देते. मैत्रीत भांडणं असतातच पण त्याहूनही जास्त असतं एकमेकांवरच प्रेम आणि एकमेकांवरचा विश्वास… त्यामुळेच मैत्रीवर आधारित सिनेमे काढण्याचा सिने इंडस्ट्रीतील निर्मात्यांना मोह आवरता येत नाही. अशाच दोन जीवलग मित्रांची, त्यांची मैत्रीची, सुख-दु:खांची कहाणी ‘फ्रेंड्स’मधून रूपेरी पडद्यावर येतीये. जी प्रत्येकालाच स्वत:ची कथा वाटेल. मराठीतील दोन लोकप्रिय चेहरे या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहेत ते म्हणजे स्वप्नील जोशी आणि सचीत पाटील. त्यांनी याआधीही काही सिनेमात कामे केली आहेत.
स्वप्नील जोशी आणि सचीत पाटीलसोबत या सिनेमात गौरी नलावडे ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे. हा सिनेमा रिलिज होण्याआधीच यातील गाणी सुरपहिट ठरली असून ‘फ्रेंड्स’मधील ‘प्रेमिका’ हे स्वप्नील जोशीवर चित्रीत गाणं सध्या चांगलंच गाजत आहे. अमित राज, पंकज पडघन आणि निलेश मोहरीर या तीन दिग्गज संगीतकारांनी या सिनेमाला संगीत दिले असून मंदार चोळकर आणि गुरू ठाकूर यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत. अॅक्शन, रोमान्स, फ्रेंडशिप, इमोशन असा मनोरंजनाचं कम्प्लिट पॅकेज असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्जा झाला असून येत्या १५ जानेवारीला हा सिनेमा रिलिज होतोय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा