Friends Actor Matthew Perry Died at 54: लोकप्रिय अमेरिकन टीव्ही शो ‘फ्रेंड्स’मध्ये चँडलरची भूमिका साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांचा गुढ मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी याही पूर्वी विविध मुलाखतींमध्ये मॅथ्यू यांनी आपल्या ढासळत्या प्रकृतीबाबत अनेकदा भाष्य केले होते. व्यसनामुळे प्रकृती बिघडली असल्याची कबुली सुद्धा मॅथ्यूने दिली होती, असे असले तरी फ्रेंड्स हा शो करताना कधीही आपण नशेत धुंद नव्हतो आणि या शो मुळेच आपल्याला सकाळी बेडवरुन उठण्याचं बळ मिळायचं असेही ते म्हणाले होते. फ्रेंड्स हा मॅथ्यू यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा असा प्रोजेक्ट असूनही जेव्हा तो शो संपला तेव्हा त्यांना अजिबात वाईट वाटले नव्हते किंवा कोणतीच भावना त्यांच्या मनात येत नव्हती असा खुलासा त्यांनी केला होता. नेमकं असं म्हणण्यामागचं कारण काय हे ही आपण पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

म्हणून फ्रेंड्स संपल्यावर दुःख झालं नाही..

ईटीने दिलेल्या विशेष लेखानुसार मॅथ्यू यांनी असं सांगितलं होतं की, २००४ मध्ये फ्रेंड्सचा शेवटचा भाग चित्रित केल्यावर सेटवर प्रत्येक जण भावुक झाला होता, अन्य पात्र साकारणारे कलाकार मिठी मारून रडत होते पण त्यावेळी डिटॉक्स औषधामुळे मॅथ्यू मात्र पूर्ण सुन्न झाले होते.

मॅथ्यू यांनी सांगितलं की, “मला काहीच वाटले नाही, मी घेत असलेल्या ओपिओइड ब्युप्रेनॉर्फिनमुळे असं झालं की आहे की नाही हे सांगू शकत नाही कदाचित मी आतूनच पूर्णपणे संपलो होतो. म्हणून, रडण्याऐवजी, मी माझ्या त्यावेळच्या गर्लफ्रेंडसह संपूर्ण सेटवर एक फेरफटका मारला. फ्रेंड्स हे माझ्यासाठी एक सुरक्षित ठिकाण होते,मला तिथे शांत वाटायचं, यामुळे मला दररोज सकाळी अंथरुणातून उठण्याचे कारण मिळाले होते आणि रात्रभर स्वतःला त्रास न देण्यासाठी सुद्धा याची मदत झाली होती. हा काळ माझ्या आयुष्यात खुप महत्त्वाचा होता, रोज चांगल्या घटना घडत होत्या आणि मला माहित होतं की एखादा वेडा माणूसच या संधीची माती करेल.”

पेरीने असेही सांगितले की, फ्रेंड्सच्या सेटवर तो कधीच व्यसन करत नसे पण त्याच्या या व्यसनांमुळे कामावर काही वेळा परिणाम झाला होता. काही चुका या सहकलाकारांनी समजून घेतल्याने कधी कोणाच्या लक्षात आल्या नाहीत पण परिणाम मला माहित होते अशी कबुली मॅथ्यूने दिली होती.