आजवर आपण कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या मैत्रीचे किस्से ऐकले आहेत. मात्र अशोक पत्की आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या मैत्रीचा किस्सा फार कमी जणांना माहित असेल. संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या जोडीने कलाविश्वात अनेक गाण्यांना एकत्र साथ दिली आहे. त्यामुळे यांची मैत्री नेमकी कशी आहे हे अशोक पत्की यांनी लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’मध्ये सांगितलं आहे.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी त्यांच्या संगीतप्रवासातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. या क्षेत्रात नेमकं पदार्पण कसं झालं इथपासून ते या क्षेत्रात कालानुरुप झालेले बदल कोणते इथपर्यंत त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं.
आणखी वाचा