बालकलाकार म्हणून वयाच्या पाचव्या वर्षी स्वप्निल मुनोतने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. बालनाट्यांमध्ये दमदार काम करत त्याने काही पुरस्कारसुद्धा जिंकले. महाविद्यालयात नाटक स्पर्धेत सहभाग व राज्यस्तरीय एकांकिकेत भाग घेत त्याने हा प्रवास सुरु ठेवला. त्यानंतर केदार शिंदेंच्या ‘खो खो’ या चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. अभिनयापासून सुरु केलेला हा यशस्वी प्रवास आता निर्मात्यापर्यंत येऊन पोहोचला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वप्नील ‘अग्गंबाई अरेच्चा २’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या टीमचा एक भाग झाला आणि त्याचसोबत छोटीशी भूमिकासुद्धा साकारली. इथूनच निर्मितीबद्दलची आवड हळूहळू वाढत गेली आणि त्यानंतर अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या मुख्य भूमिका असलेला ट्रिपल सीट हा वैयक्तिक प्रकल्प म्हणून त्याने पहिला चित्रपट तयार केला.

‘ट्रिपल सीट’च्या यशानंतर आता झी युवावर प्रसारित होणारी अपूर्वा नेमळेकर, रोशन विचारे आणि मोनिका बागल यांची मुख्य भूमिका असलेली ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेची निर्मिती केली. निर्मितीचा हा प्रवास जोमाने सुरु असून त्याने नुकतंच कडक एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली कडक मराठी हे युट्यूब चॅनेल सुरु केलं. लवकरच तो कडक संगीत म्हणून त्याचे संगीत रेकॉर्ड लेबलसुद्धा लाँच करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From actor to producer swapnil munot inspirational journey ssv