ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. शेनच्या व्यवस्थापन संघाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत तो कोह सामुई, थायलंड येथील त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्ध पडला असल्याचे सांगितले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला वाचवता आले नाही. शेनच्या मृत्यूच्या वृत्ताने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांना विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे.

रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर शेन वॉर्नचा एक फोटो शेअर केला आणि एक इमोजी पोस्ट केली आहे.

vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

शिल्पा शेट्टीने शेन वॉर्नसोबतचा एक फोटो शेअर करत, महापुरुष कायमचे जगतात, असे म्हटले आहे.

‘क्रिकेट दिग्गज शेन वॉर्नच्या अकाली निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज लेगस्पिनरची उणीव भासेल. त्याच्या आत्म्याला शांती लाभो,’ असे उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे.

रणदीप हुड्डाने ‘रेस्ट इन पीस वॉर्नी’ असे म्हटले आहे.

सनी देओलने, ‘क्रिकेटने आज तारा गमावला. शेन वॉर्नच्या आत्म्याला शांती लाभो,’ असे म्हटले.

ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने २००७ मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर्नच्या नावावर कसोटीत ७०८ तर वनडेत २९३ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.