सिनेमाचं वेड गावखेडय़ात राहणाऱ्या आणि शहरात राहणाऱ्या माणसासाठी सारखंच असतं. कधी काळी पडद्यावरच्या नट-नटय़ांकडे पाहून ‘हिरो’ व्हायचंय मला म्हणत गाव सोडून मुंबईकडे येणाऱ्यांची संख्या तेव्हाही कमी नव्हती आणि आजही नाही. मात्र पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांच्याही पलीकडे जात मला काही सांगायचं आहे आणि त्यासाठी सिनेमाचं माध्यम चांगलं आहे म्हणत गावखेडय़ातून सिनेमाची वाट शोधत मुंबईकडे येणाऱ्या तरुण दिग्दर्शकांची संख्या वाढते आहे. अर्थात, यात आजही पुण्या-मुंबईतील तरुण दिग्दर्शकांचं प्रमाण जास्त असलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये खेडय़ातून शिनिमाचं स्वप्न घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झालेल्या दिग्दर्शकांचा टक्काही तितकाच वाढतो आहे.
सोलापूर जिल्ह्य़ातल्या करमाळ्यात राहणारा कुणी एक नागराज मंजुळे असाच पडद्यावरचा शिनिमा पाहून भारावला. ग्रामीण आणि शहरी असे ठळक भेद करायचे म्हटले तरी जगण्यातली तफावत मोजता येऊ नये इतकं समाजमनांमध्ये असलेलं अंतर दाखवून देण्यासाठी त्याने सिनेमाची ताकद वापरली. कसा पोहोचला तो या सिनेमापर्यंत? ‘धग’सारख्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या जळगावच्या शिवाजी लोटन पाटील यांच्याबद्दल प्रस्थापितांनाही आश्चर्य वाटलं होतं आणि तेवढंच अप्रूप आज जमीन विकून सिनेमा करणाऱ्या आणि त्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ‘ख्वाडा’च्या भाऊराव कऱ्हाडेंबद्दलही आहे. मात्र, गावखेडय़ातून मुंबईकडे सिनेमा करण्यासाठी येणाऱ्या या तरुण दिग्दर्शकांचा एक प्रवाह खुला झाला असला तरी याच वाटेने येणाऱ्या आणखी सर्जनशील मनांसाठी पायवाट तयार करावी असं या दिग्दर्शकांना वाटतं का? त्याचं उत्तर काही अंशी नाही असं आहे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा