मराठीतही सध्या मल्टिस्टार चित्रपट येत असून, अब्रार खान दिग्दर्शित ‘फूल टू धमाल’ या चित्रपटातही ‘बालगंधर्व’फेम सुबोध भावेसह संजय नार्वेकर, स्मिता गोंदकर, निशा परुळेकर, मनीषा यादव, अमृता देशमुख असे कलावंत आहेत. या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त झाला. शंकर यादव या चित्रपटाचे निर्माते असून मराठी सिनेमाच्या विनोदी परंपरेतील हा चित्रपट असेल. दिग्दर्शकाचाही हा पहिलाच प्रयत्न असून हिंदीतील प्रियदर्शन यांच्या विनोदी शैलीतील चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाचे कथानक असेल.