झोया अख्तरच्या गली बॉय चित्रपटामधील ‘इंडिया 91’ या गाण्याला आवाज देणारा रॅपर धर्मेश परमार, ज्याला ‘एमसी तोडफोड’ म्हणून ओळखले जाते त्याचे वयाच्या २४ व्या वर्षी निधन झाले आहे. या तरुण गायकाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. धर्मेश मुंबईस्थित हिप-हॉप सामूहिक स्वदेशी या बॅण्डशी संबंधित होता.
धर्मेशच्या निधानबद्दल गली बॉय चित्रपटाचे अभिनेते रणवीर सिंग आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तर या चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. स्वदेशी बॅण्डने धर्मेश परमारच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. काही माध्यमांवर सांगितलं जात आहे की धर्मेशचा अपघाती मृत्यू झाला आहे. परंतु अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रणवीर, सिद्धांत, झोया यांच्यासह अनेकांना धर्मेशच्या निधानवर शोक व्यक्त केला आहे.
‘गली बॉय’..हा चित्रपट म्हणजे धारावीच्या गल्ल्यांमध्ये लहानाचा मोठा झालेल्या एका रॅपरची कथा होती. समाजामध्ये दोन वर्ग निर्माण झाले आहेत. एक उच्चभ्रू लोकांचा तर दुसरा गरीबी आणि दारिद्रय यांच्याशी संघर्ष करणारा. दारिद्र्याच्या गर्तते अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची कथा, त्याचं दु:ख मुराद अर्थात गली बॉय (रणवीर सिंह) त्याच्या रॅपमधून समाजासमोर मांडतांना यामध्ये दाखवले गेले. या दु:खाला वाचा फोडत असतानाच त्याचं नशीब त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतं आणि तो ठरतो देशातला सर्वात प्रसिद्ध असा रॅपर. या प्रसिद्ध रॅपरची कथा समाजापुढे मांडण्यासाठी दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी केलेला प्रयत्न या चित्रपटातून दिसतात.