सध्या एकाच वेळी अनेक गोष्टींत रस घेता येऊ शकतो असे मनोरंजन क्षेत्रातले वातावरण आहे. मनीषा केळकर त्याचा उत्तम आनंद व अनुभव घेत असल्याचे तिच्या भेटीत जाणवले. दिग्दर्शक राजेश जाधव याच्या ‘चंद्रकोर’ या चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिला लावणी नृत्य साकारायला मिळाले म्हणून ती विशेष उत्साहात आहे.
सध्या ती ‘झुंज मराठमोळी’ या साहसाची कसोटी लागणाऱ्या ‘छोटय़ा पडद्या’वरच्या कार्यक्रमात अन्य स्पर्धकांवर मात करीत करीत पुढे ‘चाल’ मिळवत आहे. ‘आफरीन’ या उर्दू शब्दाच्या मराठी चित्रफितीमधूनही ती रसिकांसमोर येणार आहे. या चित्रफितीसाठीचे प्रेमगीत रोशनी मालवणकर हिने लिहिले आहे, तर ते स्वरूप मालवणकर याने गायले व संगीतबद्ध केले आहे, तोच या चित्रफितीमध्ये मनीषासोबत भूमिका साकारणार आहे.  मुरुड येथे या प्रेमगीताचे चित्रीकरण होणार आहे. त्या प्रेमगीताचे बोल आहेत – ‘सुंदरशा स्वप्नातले शिल्प रेशमी’. मनीषा केळकर आता ‘बंदूक’ या हिंदी चित्रपटानंतर आदित्य ओम दिग्दर्शित व अभिनीत ‘फन फ्रीट फेसबुक’ या हिंदी चित्रपटातून भूमिका साकारणार आहे. त्यात आपण अगदी वेगळ्या रूपात दिसू, असे ती म्हणते. एकूण काय, तर चौफेर घोडदौड करण्याची तिची ‘मनीषा’ पूर्ण होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा