Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची मुख्य भूमिका असलेला ‘गेम चेंजर’ व सोनू सूदचा चित्रपट ‘फतेह’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दोन्ही शुक्रवारी (१० जानेवारी रोजी) बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांपैकी कोणता कमाईच्या बाबतीत बाजी मारणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. पहिल्या दिवसाच्या कमाईच्या आकडेवारीनुसार, ‘गेम चेंजर’ने ‘फतेह’ पेक्षा जास्त कमाई केली आहे.

‘फतेह’ व ‘गेम चेंजर’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईत मोठी तफावत आहे. दोन्ही सिनेमांनी पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवला, ते जाणून घेऊयात.

‘गेम चेंजर’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

Game Changer Box Office Collection Day 1 : कियारा अडवाणी व राम चरण यांच्या ‘गेम चेंजर’ने चांगली ओपनिंग केली आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ५१.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर त्या तुलनेत ‘फतेह’ची कमाई खूप कमी आहे. ‘गेम चेंजर’च्या हिंदी व्हर्जनने ७ कोटी रुपये कमावले आहेत. या सिनेमाने जगभरात १८६ कोटी रुपये कमावल्याची पोस्ट निर्मात्यांनी केली आहे.

हेही वाचा – बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “आयुष्यात…”

‘गेम चेंजर’ हा पॅन इंडिया चित्रपट असून हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला आहे. चित्रपटाने तेलुगू भाषेत सर्वाधिक व्यवसाय केला आहे. चित्रपटाने या तेलुगूमध्ये ४२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून उर्वरित कलेक्शन इतर भाषांमधून केले आहे. या चित्रपटाने तामिळमध्ये २.१ कोटी, हिंदीमध्ये ७ कोटी, कन्नडमध्ये ०.१ कोटी आणि मल्याळममध्ये ५० लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.

हेही वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”

‘फतेह’ची पहिल्या दिवसाची कमाई

Fateh Box Office Collection Day 1 : सोनू सूदच्या ‘फतेह’ने पहिल्या दिवशी फक्त २.४५ कोटींचा व्यवसाय केला. सोनू सूदने ‘फतेह’मध्ये फक्त अभिनय केलेला नाही, तर तो स्वत: या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. फतेहमध्ये जॅकलिन फर्नांडिसदेखील आहे. ‘फतेह’चे बजेट २५ कोटी रुपये आहे. आता हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करणार, याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”

राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा बहुप्रतिक्षित ‘गेम चेंजर’ हा ॲक्शन-ड्रामा आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या एका प्रामाणिक आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात राम चरण दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याने वडील आणि मुलाची भूमिका साकारली आहे.

‘फतेह’मध्ये सायबर क्राइममध्ये अडकलेल्या लोकांची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसची भूमिकाही महत्त्वाची आहे. तसेच विजय राज आणि नसीरुद्दीन शाहदेखील सिनेमात आहेत. यात नसीरुद्दीन शाह खलनायकाच्या भूमिकेत आहेत.

Story img Loader