राज्य करण्याची सुप्त इच्छा ही मानव या पृथ्वीवरील सर्वात प्रगल्भ प्राण्याला मिळालेली एक जन्मजात देणगी आहे. पुढे या इच्छेचे महत्त्वाकांक्षेत रूपांतर होते. आणि सम्राट अशोक, जॉर्ज वॉशिंग्टन, अडॉल्फ हिटलर, मायकेल जॅक्सन, सर डॉन ब्रॅडमन यांसारखी काही असामान्य व्यक्तिमत्त्वे निर्माण होतात. या सर्व मंडळींची कार्यक्षेत्रे भिन्न आहेत. परंतु विशिष्ट क्षेत्रावर स्वत:चे आधिपत्य स्थापन करणे हा एक समान धागा यांच्यात आहे असे म्हणता येईल. साम्राज्य निर्माण करणे हे सोपे असते, परंतु ते टिकवणे हे फार कठीण काम आहे. ते टिकवण्यासाठी आíथक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध पातळींवर प्रयत्न केले जातात. पाहता पाहता प्रयत्नांची प्रखरता कमाल मर्यादेपर्यंत पोहोचते. आणि किलगचे युद्ध, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, व्हिएतनाम युद्ध, भारत – पाकिस्तान युद्ध असा रक्तरंजित इतिहास निर्माण होतो. थोडक्यात काय तर आधिपत्य स्थापन करणे आणि ते टिकवणे हे राज्यकर्त्यांच्या अंगात प्रतिस्पध्र्याला वारंवार नामोहरम करण्याची क्षमता किती आहे यावर अवलंबून असते. प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवलेली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका याच संकल्पनेवर आधारित आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे अगणित राजकीय ताकद मिळवण्यासाठी सुरू झालेला सत्तेचा खेळ होय. जॉर्ज आर. आर. मार्टनि यांच्या ‘साँग ऑफ आइस अॅण्ड फायर’ या कादंबरीवरून या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. २०११ साली सुरू झालेल्या या मालिकेचे सातवे सत्र लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मार्टनि यांनी या कादंबरीचे लिखाण सात भागांत केले आहे. यांतील प्रत्येक भागावर अनुक्रमे एक सत्र या क्रमाने आत्तापर्यंत सहा सत्रांची निर्मिती झाली होती. आता सातव्या सत्राबद्दलही लोकांच्या मनात तेवढीच उत्सुकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा