गणपती बाप्पा म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. कोणाला त्याच्या देवत्वाची प्रचिती येते तर कोणाला दिव्यत्वाची, कोणाला तो आपला मित्र वाटतो, तर कोणाला मार्गदर्शक. मालिकेमध्ये गणेशाच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे आणि ती म्हणजे गणेशाचं प्रापंचिक जीवन. गणपतीच्या आयुष्यात रिद्धी आणि सिद्धीचं आगमन झालं आहे. पण आता गणेशाचं प्रापंचिक जीवन कसं सुरु होणार? यामध्ये किती अडथळे येणार? रिद्धी आणि सिद्धीच्या मार्गात येणारे अडथळे त्या कशा प्रकारे दूर करणार? हे बघणे रंजक असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिद्धी आणि सिद्धीला अद्याप माहिती नाही की त्या ब्रह्मकन्या आहेत. पण त्यांना आदिशक्तीने असा दृष्टांत दिला आहे की, तुम्हाला गणेशाच दर्शन घ्याव लागणार आहे आणि त्यातूनच तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांच निरसन होणार आहे. रिद्धी आणि सिद्धी त्या दृष्टांताला लक्षात ठेऊन अष्टविनायकाच्या दर्शनास प्रारंभ केला आहे, त्यांना या प्रवासामध्ये अनेक अडथळे येत आहेत पण त्यांच्या नकळतच बाप्पा हे अडथळे दूर करत आहे. याच परीक्षांना आणि अडथळ्यांना सामोरं जाताना आणि अष्टविनायकाचे दर्शन घेत असतानाच त्यांना कळणार आहेत की त्या ब्रह्मकन्या आहेत. परंतु, याच दरम्यान इंद्राची पत्नी सची ही रिद्धी आणि सिद्धीबद्दल बऱ्याच गोष्टी पार्वतीला सांगते. त्यामुळे पार्वतीच्या मनामध्ये असलेली रिद्धी आणि सिद्धीबद्दलची चांगली मतं कुठेतरी डगमगू लागतात. अष्टविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा श्रीगणेश या दोघींना कैलासावर घेऊन येतात तेव्हा पार्वती या दोघींना स्वीकारेल की त्यांना कैलासावरूनच परत जायला सांगेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

पार्वती रिद्धी आणि सिद्धीला सून म्हणून स्वीकारणार? रिद्धी आणि सिद्धीला गणेशासोबत प्रापंचिक जीवन सुरु करण्यासाठी अजून किती परीक्षा आणि अडथळ्यांना समोरं जावं लागणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganapati bappa morya serial marathi colors marathi
Show comments