बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी होण्यासाठी तसेच स्वत: किंवा चित्रपट चर्चेत राहण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही शक्कल लढवत असतो. असाच एक प्रकार बॉलीवूडमधील कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी केला असून ते एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
एका आगामी चित्रपटात ‘कोरिओग्राफर’ गणेश आचार्य ‘अभिनेता’ म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या भूमिकेसाठी त्यांनी आपले वजन चक्क २०० किलोच्याही पुढे नेले आहे. विशिष्ट भूमिकेसाठी काही कलाकार आपले वजन घटवितात तर काही मंडळी सिक्स, एट पॅक्सने शरीर कमावतात. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी आपले वजन ४० किलोंवरून चक्क २०० किलोच्या पुढे नेले आहे. ‘हे ब्रो’ या आगामी चित्रपटासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
चित्रपटात दोन भावांची कथा सादर करण्यात आली असून गणेश आचार्य यांच्या भावाची भूमिका मणिंदर करत आहे. चित्रपटातील विशिष्ट भूमिकेसाठी अनेक कलाकार आपले वजन घटवितात. मात्र ‘हे ब्रो’तील आपल्या भूमिकेसाठी आपण वजन वाढविले असल्याचे गणेश आचार्यचे म्हणणे आहे.
या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिरजू’ हे गाणे तयार करण्यात आले असून यात अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, अजय देवगण, रणवीर सिंह, प्रभुदेवा अशी दिग्गज मंडळी दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून सध्या बॉलीवूडमध्ये गणेश आचार्य यांच्या वाढलेल्या वजनाची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा