मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. “देशात सुरू असलेली आर्थिक मंदी लवकरात लवकर संपावी आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुख-समृद्धी लाभावी”, असं साकडं बाप्पाला घातल्याचं सोनालीने यावेळी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“देशात सुरु असलेली आर्थिक मंदी लवकरात लवकर संपू दे आणि महाराष्ट्रातील जे पूरग्रस्त आहेत, त्या नागरिकांना सुख,समाधान आणि समृद्धी लाभू दे”, अशी प्रार्थना सोनालीने केली आहे.

पुढे ती म्हणते, “खरंतर सध्या जी नैसर्गिक आपत्ती ओढावत आहे. त्यासाठी आपणच कारणीभूत आहोत. आपल्याच चुका या साऱ्यासाठी जबाबदार आहेत. आतापर्यंत काय झालं याचा विचार करण्यापेक्षा या पुढे काय चांगलं करता येईल याकडे साऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे”.

दरम्यान, सोनाली दरवर्षी पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती तयार करत असते. सोनाली तिच्या घरीच शाडूच्या मातीची मूर्ती तयार करते आणि घरामध्येच त्याचं विसर्जन करते. यावेळी तिने बालगणेशाची मूर्ती साकारली असून बाप्पाच्या हातात वीणा असल्याचं दिसून येतं.

 

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१९ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi2019 sonali kulkarni economic slowdown ssj
Show comments