सिद्धार्थ जाधव

खरंतरं आमच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात नाही. पण मला लहानपणापासूनचं बाप्पाची आवड आहे. त्यामुळे मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या घरी मी गणपती उत्सवात दर्शनाला जातो. लहान असताना गणपतीच्या मंडपात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जायचं. मी पण त्यात सहभाग घ्यायचो. लहान मुलांसाठी तेव्हा विशेष स्पर्धा असायच्या. चमचा गोटी, निबंध स्पर्धा , चित्रकला अशा अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जायचं. खूप मज्जा यायची तेव्हा. बाबा तेव्हा आम्हाला लालबागचे सर्व गणपती पहायला न्यायचे. ते दिवसचं फार वेगळे होते. आता इतका वेळ मिळत नाही. पण, त्यातल्या त्यात नातेवाईकांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो. त्यानिमित्ताने नातेवाईकांची भेट होते. मित्रांनाही भेटता येतं. गेले काही वर्ष ‘जागो मोहन प्यारे’ नाटकामुळे नेमकं गणपतीच्या सणातचं दौ-यावर जावं लागतं होतं. पूर्ण १२ दिवस त्यातचं जायाचे. त्यामुळे सणांच्या दिवसात कुटुंबियांनाही वेळ देणं शक्य व्हायचं नाही.

Story img Loader