आपल्या नाविन्यपूर्ण शैलीतील संगीतामुळे प्रसिद्धिस आलेली ‘गॅंग ऑफ वासेपूर’ ची संगीत दिग्दर्शिका स्नेहा खानवलकर काही दिवसांपासून तिच्या संगीत दिग्दर्शनाच्या कामापासून दुरावलेली आहे. तिचे संगीत ऐकण्यासाठी संगीतप्रेमी आतुर आहेत. तीन महिने झाले तरी तिचे कोणतेच नवे संगीत प्रदर्शित झालेले नाही. स्नेहाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. गेले तीन महिने तिच्या हातावर उपचार सुरु असल्याचे स्नेहाने सांगितले. संगीतप्रेमींना निदान जुलैपर्यंत तरी तिच्या संगीतासाठी वाट पाहावी लागणार आहे. स्नेहाने ‘गॅंग ऑफ वासेपूर’ चित्रपटातील संगीताद्वारे बोलिवूडवर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. खुद्द ए.आर.रेहमान देखील ” वासेपूर की वूमनिया” कुठे गायब झाली आहे असे म्हणतोय.
जोपर्यंत माझा हात ठीक होत नाही तोपर्यंत मी कोणतेही नवीन काम हाती घेणार नाही. मी बॉलीवूडसाठी अद्याप नवीन आहे. येथे अजून तरी जास्त महिला संगीतकार आलेल्या नाहीत. अभिनेत्री नरगिसची आजी जद्दनबाई आणि उषा खन्ना या प्रख्यात संगीतकार होत्या. आता बॉलिवूड माझ्याकडे एक नवीन महिला संगीतकार म्हणून पाहात असेल, तर मला नक्कीच या गोष्टीचा आनंद आहे.

Story img Loader