बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. तर कालच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. पहिल्या दिवसाची कमाई पाहता, आलियाचा हा चित्रपट विकेंडला धमाल करेल असे म्हटले जात आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या रिपोर्टनुसार, आलियाच्या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन हे सुमारे ९-१० कोटी इतके आहे. चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यांचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन बघितले तर ते चांगले कलेक्शन मानले जाते.

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
arjun rampal grandfather designed first artillery gun for Indian Army
तब्बल १४ फ्लॉप चित्रपट देऊनही जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार

आणखी वाचा : युक्रेनच्याया’ महिलेला घाबरत होते रशियाचे राष्ट्रपती पुतिन

आणखी वाचा : मुंबईच्या आयुक्तांच्या नावाने सोनू निगमला शिवीगाळ करत धमकी; व्हिडीओ शेअर करत म्हटला “इक्बाल चहल…”

करोना काळानंतर चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी मोठी कमाई करणारा हा दुसरा चित्रपट आहे. हे पाहता हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचे सगळे रेकॉर्ड तोडू शकतो. ‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून जगभरात बॉक्स ऑफिसवर ५० कोटींहून अधिक कमाई केली.

आणखी वाचा : “मलाच सगळं करावं लागत अन् माझ्या भावाला….”; अमिताभ बच्चन यांच्या नातीने घरात होणाऱ्या भेदभावावर केले होते वक्तव्य

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

Story img Loader