मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातून कामाठीपुरा हा उल्लेख वगळण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका करण्यात आल्या आहेत. चित्रपटातील कामाठीपुरा या उल्लेखाने संपूर्ण परिसराची विशेषत: येथील महिलांची बदनामी होत आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस आमदार अमीन पटेल यांच्यासह या परिसरातील रहिवासी श्रद्धा सुर्वे यांनी याप्रकरणी याचिका केली आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्यातील सुर्वे यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. तर पटेल यांच्या जनहित याचिकेवरही लवकरच सुनावणीची शक्यता आहे. हुसैन झैदीलिखित पुस्तकावर ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा आधारित आहेत. चित्रपटात कामाठीपुरा परिसर वाईट दृष्टीने दाखवण्यात आला आहे. परिणामी, येथे राहणाऱ्या रहिवाशांची बदनामी होऊ शकते. त्यामुळे कामाठीपुरा या उल्लेखासह चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यात आल्यास रहिवाशांचे, विशेषत: महिलांचे नुकसान आणि अनादर होईल, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. कामाठीपुराऐवजी मायापुरी किंवा मायानगरी असा उल्लेख करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. सध्या या परिसरात केवळ पाच टक्के देहिवक्रीचा व्यवसाय होत आहे. असे असतानाही चित्रपटात मात्र संपूर्ण परिसर या व्यवसाशी संबंधित असल्याचे दाखवण्यात आल्याबद्दल याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. तर या संपूर्ण परिसराला देह व्यापाराचे केंद्र म्हणून दाखवण्यात आल्याने स्थानिक सामाजिक सेवा संस्था आणि रहिवाशांकडून अनेक आक्षेप घेणाऱ्या तक्रारी आपल्याकडे आल्याचा दावा पटेल यांनी आपल्या याचिकेत केला आहे.