बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा पासून प्रदर्शित झाला तेव्हा पासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट शुक्रवारी २५ फेब्रुवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावर टांगती तलवार आहे. सगळ्यात आधी गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कामाठीपुरा या परिसरातील रहिवाशांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आणि त्यासोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा विरोध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामाठीपुरा येथील स्थानिक रहिवाशांनी “गंगुबाई काठियावाडी” या चित्रपटाचा विरोध केला आहे. तर या चित्रपटात कामाठिपूरा या परिसराला खराब असल्याचे दाखवण्यात आल्याचे म्हणतं घोषणा करत नाराजी व्यक्त केली आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे बॅनर आणि पोस्टर्स घेऊन, तिथल्या स्थानिक लोक घोषणा देत होते, ‘आलिया की फिल्म गंगूबाई बॅन की जाए…’. चित्रपटात कामाठीपुराला चुकीचे आणि लज्जास्पद असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

या चित्रपटाला विरोध करणार्‍या स्थानिकांनी दावा केला आहे की, ‘त्यांचं कामाठीपुरा २५० वर्ष जुनं आहे, तिथे अनेक इंजिनियर्स, पायलट, डॉक्टर होते. पण चित्रपटांमुळे त्यांची बदनामी होते’. इंटरव्ह्यू देऊनही लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत. हे ऐकून वाईट वाटतं!.’ या चित्रपटावर बंदी आणली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

आणखी वाचा : “I love myself but…”, रितेशन शेअर केला जिनिलियासोबतचा रोमँटिक व्हिडीओ

आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या “माफिया क्वीन्स ऑफ मुंबई” या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे. वेश्याव्यवसायात विकल्या गेलेल्या ‘गंगूबाई’ या तरुणीच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. ‘गंगुबाई’ अंडरवर्ल्ड आणि कामाठीपुरा रेड-लाइट एरियातील एक प्रमुख, प्रतिष्ठित व्यक्ती कशी बनते हे चित्रपटात दाखवते. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईची मुख्य भूमिका साकारत आहे. १९६० च्या दशकात गंगूबाई कामाठीपुरामधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक होत्या. अलीकडेच आलिया भट्ट ७२ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गंगूबाई काठियावाडी’च्या वर्ल्ड प्रीमियरसाठी बर्लिनला गेली होती. हा चित्रपट १६ फेब्रुवारी रोजी बर्लिनमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangubai kathiawadi people from kamathipura protest against alia bhatt movie for showcasing area in bad light dcp