बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा पासून प्रदर्शित झाला तेव्हा पासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट शुक्रवारी २५ फेब्रुवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावर टांगती तलवार आहे. सगळ्यात आधी गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता या चित्रपटातून कामाठीपुराचा उल्लेख वगळण्यासाठी आमदार अमीन पटेल यांच्यासह दोन स्थानिक रहिवाशांनी याचिका दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातून कामाठीपुराचा उल्लेख वगळण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी आमदार अमीन पटेल आणि कामाठीपुरा येथील स्थानिक रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले असताना ही याचिका दाखल झाल्यानं आता या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

काय म्हणाले आमदार अमीन पटेल?
लोकसत्ता डॉटकॉमशी बोलताना आमदार अमीन पटेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘चित्रपटातून ‘काठियावाडी’ नाव काढून टाकावं अशी मागणी आम्ही या याचिकेत केली आहे. कारण ते एका विशिष्ट समुदायाशी संबंधित आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण कामाठीपुरामध्ये वेश्या व्यवसाय चालतो असं ट्रेलरमधून- चित्रपटातून दाखवलं आहे. वस्तुतः हे एक-दोन गल्लीतपुरतं मर्यादीत आहे, जिथली लोकसंख्या ७००-८०० पुरती एवढीच आहे. मात्र कामाठीपुराची लोकसंख्या ही ३० हजारपेक्षा कितीतरी जास्त आहे. चित्रपटातील या चित्रिकरणामुळे संपूर्ण कामाठीपुराची बदनामी होत आहे. कामाठीपुराबाबत एक चुकीचं चित्र यामुळे उभे राहत आहे.’

आणखी वाचा- Gangubai Kathiawadi: ‘मेरी जान’ गाण्यात आलिया- शांतनूचा कारमधील रोमान्स चर्चेत, पाहा व्हिडीओ

काय आहे प्रकरण?
कामाठीपुरा येथील स्थानिक रहिवाशांनी “गंगुबाई काठियावाडी” या चित्रपटाला विरोध केला होता. त्यांनी या चित्रपटात कामाठीपुरा परिसराचं चुकीच्या पद्धतीनं चित्रण केल्याचं म्हणत घोषणा देऊन नाराजी व्यक्त केली होती. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे बॅनर आणि पोस्टर्स घेऊन, तिथले स्थानिक लोक, ‘आलिया की फिल्म गंगूबाई बॅन की जाए…’ अशा घोषणा देत होते. चित्रपटात कामाठीपुराला चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता.

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त अभिनेता अजय देवगणचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अजय देवगण या चित्रपटात करीम लाला यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता शांतनू माहेश्वरीच्या भूमिकेचं नाव ‘अफसान’ असं आहे. याशिवाय अभिनेता विजय राज देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.