अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकलेला दिसत आहे. सुरुवातीला काही लोकांनी या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला. त्यानंतर आलियाच्या कास्टिंगवर आणि आता या चित्रपटात अभिनेता विजय राजनं साकारलेल्या तृतीयपंथी महिलेच्या भूमिकेवरुन नवा वाद सुरू झाला आहे. या सर्व गोष्टींवर आता अभिनेत्री आलिया भट्टनं प्रतिक्रिया दिली आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात अभिनेता विजय राज रजियाबाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक लोकांनी सोशल मीडियावर या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या भूमिकेसाठी विजय राजला कास्ट करण्यावरून लोकांनी टीका केली आहे. त्यांच्या मते ही भूमिका एखाद्या खऱ्याखुऱ्या ट्रान्सजेंडरला साकारण्याची संधी द्यायला हवी होती. इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीपासूनच ट्रान्सजेंडर किंवा होमोसेक्शुअल कलाकारांसाठी कमी संधी मिळतात. त्यामुळे या भूमिकेसाठी विजय राजला कास्ट करण्यावर लोकांनी आक्षेप घेतला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया भट्टनं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, ‘मी हे सर्व या अगोदरही वेगवेगळ्या चित्रपटांसाठी ऐकलं आहे. मला माहीत आहे की अशा भूमिका कुठून येतात. हे सर्व दिग्दर्शकावर अवलंबून असतं. त्यांचा दृष्टीकोन असतो. यामुळे कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा हेतू नाही. कदाचित दिग्दर्शकांना या भूमिकेसाठी विजय राज योग्य वाटले असावेत. जो एक पुरुष आहे आणि ट्रान्स भूमिका साकारत आहे. अशा गोष्टी पाहायची प्रेक्षकांना सवय नाही. पण दिग्दर्शक एका अभिनेत्याकडे पाहतात. तेव्हा ते या भूमिकेमुळे त्यांच्यात होणाऱ्या बदलांकडेही पाहतात. मला वाटतं हा चांगला दृष्टीकोन आहे.’

चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना आलिया म्हणाली, ‘आपल्याकडे चित्रपटांमध्ये या आधी कधीच सेक्स वर्कर दाखवण्यात आले नाहीत असं नाही. हा व्यवसायिक विषय नसला तरी या विषयावर अगोदरही चित्रपट बनवले गेले आहेत. मला वाटतं जर तुम्ही प्रेक्षकांना एक चांगली व्यक्तीरेखा देता, जी त्याच्या आसपास वावरणारी आहे तर अशावेळी हे थोडं विचित्र वाटतं. पण या चित्रपटाचं जे केंद्रस्थान आहे ते सामाजिक स्तरावर खूपच मजबूत आहे. ही एका संघर्षाची कथा आहे. मला वाटतं या कथेशी प्रत्येक व्यक्ती कनेक्ट करू शकेल.’

Story img Loader