बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गौहर चाहत्यांच्या संपर्कात राहते. गौहर आणि तिचा पती झैद दरबार हे दोघे काही दिवसांपूर्वी त्यांच्या हनीमूनसाठी रशियाला गेले होते. तिथून परतल्यानंतर मुंबई विमानतळावरील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.
त्यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत गौहरने गुलाबी रंगाचा जंपसूट परिधान केला आहे. तर, झेदने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्टस परिधान केली आहे. तर या व्हिडीओ सोबत त्यांचा रशियातील एक व्हिडीओ प्ले होताना त्यात दिसतं आहे.
आणखी वाचा : ‘मला तैमूरची शी साफ करता येत नव्हती, मी एक परिपूर्ण आई नव्हते…’,करीनाने केला खुलासा
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
त्यांनी हे रील रशियात केलं होतं. हे पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘रशियात रील बनवून परत आले.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आई आणि मुलगाच भेटला तुम्हाला फोटो काढायला.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पहिले हा टिक टॉकर होता आणि आता दोघे झाले आहेत आणि या लोकांच प्रमोशन हे पागल करतात,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी गौहर आणि तिचा पती झेदला ट्रोल केले आहे.

गौहर आणि झेद दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते दोघे ही सोशल मीडियावर वेगवेगळे डान्स व्हिडीओ, विनोदी व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यांचे हे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात. दरम्यान, गौहर आणि झैद यांनी २५ डिसेंबर रोजी लग्न केले. झैद संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. तर गौहर आणि झैदमध्ये १२ वर्षांच अंतर आहे.