‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री गौहर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गौहर ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गौहर चाहत्यांच्या संपर्कात असते. ती बऱ्याचवेळा काही व्हायरल व्हिडीओ शेअर करत त्यावर तिची प्रतिक्रिया देत असते. नुकताच तिने एक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
गौहरने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील आहे. ज्यामध्ये एक महिला फळांच्या गाडीवरून पपई उचलून फेकताना दिसत आहे. यादरम्यान फळ विक्रेता त्या महिलेला असे करू नका, अशी विनंती करत आहेत. मात्र ती महिला कोणातीही गोष्ट ऐकून घेत नसल्याचे दिसत आहे. त्या फळ विक्रेत्याच्या गाडीला महिलेच्या गाडीचा स्पर्श झाल्याने हा सर्व प्रकार घडला. यानंतर महिला फळ विक्रेत्यावर चिडली होती. त्याचा हा व्हिडीओ शेअर करत गौहर म्हणाली, काय मुर्खपणा आहे हा. तिला लाज वाटली पाहिजे. जर तुम्हाला या फळ विक्रेत्याबद्दल कोणत्याही माहिती मिळाली तर कृपया मला द्या, तिने केलेल्या नुकसान पाहता, मला त्याची त्याची संपूर्ण हातगाडी खरेदी करायची आहे. तिला नाव काय आहे आणि तिला लाज वाटली पाहिजे. गौहरचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
काय आहे प्रकरण?
भोपाळच्या बरखेडी भागात ही घटना घडली आहे. वृत्तानुसार, ही महिला एका खासगी विद्यापीठात प्राध्यापक आहे. हा फळविक्रेता महिलेच्या घराजवळून जात असताना त्याच्या हातगाडीची धडक गाडीला बसली. गाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही तरी महिलेला राग अनावर झाला. यानंतर महिला हातगाडीवर तुटून पडली आणि हातगाडीवरुन पपई रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली. असे करू नका, गाडीचे नुकसान झाले आहे त्याचे पैसे माझ्याकडून घ्या, अशी विनंती फळविक्रेत्याने केली. मात्र त्यानंतरही महिला प्राध्यापकाने ऐकले नाही आणि हातगाडीवरील फळे फेकणे सुरूच ठेवले. वाटेने जाणारे लोक तिथे पोहोचल्या नंतर त्यांनी कसेबसे त्या महिलेला थांबवले.
अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ देखील काढला. आता याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी सुरू केली. काही लोकांनी इतके रागावणे योग्य नाही असे म्हटले आहे. तर काही लोकांनी भोपाळ पोलिसांना देखील टॅग केले आहे.
आणखी वाचा : अभिनेत्रीने हॉटेलमध्ये केली चोरी? टीना दत्ताचे कृत्य कॅमेऱ्यात झाले कैद
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची त्वरीत दखल घेत भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लावनिया यांनी महिला आणि फळ विक्रेत्याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.