उत्तर प्रदेशमधील लखनऊमधल्या एका तरुणीने कॅब ड्रायव्हरला भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आता या मारहाण करणाऱ्या तरूणीला अटक करण्याची मागणी लावून धरलीय. त्यामूळे सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलंय. यावर आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री गौहर खान हिने सुद्धा व्हिडीओमधल्या त्या मारहाण करणाऱ्या तरूणीवर निशाणा साधलाय.

अभिनेत्री गौहर खान मुंबई एअरपोर्टवर असताना स्पॉट झाली आणि त्यावेळी पापाराझींने नुकतंच व्हायरल होत असलेल्या लखनऊ गर्लच्या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया विचारली. यावेळी अभिनेत्री गौहर खानने त्या व्हिडीओमधील ड्रायव्हरने ज्या पद्धतीने त्या परिस्थितीत समतोल राखला त्याबद्दल त्याचं कौतुक केलंय. यावेळी अभिनेत्री गौहर खान म्हणाली, “त्या प्रसंगात कॅब ड्रायव्हरने जो संयम दाखवला, मुलीप्रती आदर राखला, तो त्यांचा चांगुलपणा होता. यातून त्यांचे संस्कार दिसून येतात आणि अशा पुरूषांची भारतात खूप गरज आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कॅब ड्रायव्हरला केला सलाम

यापुढे बोलताना अभिनेत्री गौहर खान म्हणाली, “व्हिडीओतल्या त्या मुलीने स्त्री असल्याचा फायदा उचललाय. म्हणजे उर्मटपणाला पण काही मर्यादा असतात. अशा परिस्थीतीत जशास तसं उत्तर तो कॅब ड्रायव्हर देऊ शकला असता. मात्र त्याने तसं न करता परिस्थिती हाताळली त्यासाठी मी त्यांना सलाम करते.”

नवा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशमधील लखनऊ मध्ये एका तरुणीने कॅब ड्रायव्हरला मारतानाच्या या व्हायरल व्हिडीओमधल्या तरूणीचं नाव प्रियदर्शिनी यादव आहे. तिच्या या व्हिडीओनंतर आणखी नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती तिच्या शेजाऱ्यांना जोरजोरात भांडताना दिसत आहे. शेजारच्या घरातील गेटला काळा रंग का दिला यावरून ती शेजाऱ्यांशी भांडण करताना दिसून येतेय.

जीवाला धोका

प्रियदर्शिनी यादव या व्हिडीओमध्ये म्हणतेय की, “मी पोलिसांना विनंती करतेय की, शेजाऱ्यांना त्यांच्या घराच्या गेटला पुन्हा वेगळा रंग लावण्याचा आदेश द्या. कारण इथे आंतरराष्ट्रीय ड्रोन फिरत असतात, आणि काळ्या रंगामुळे इथे त्यांचं लक्ष जात असतं. त्यामूळे इथे राहणाऱ्या सर्व शेजाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.”

 

व्हिडीओ दोन वर्षापूर्वीचा आहे

प्रियदर्शिनी यादव या तरूणीचा हा जुना व्हिडीओ असून तो दोन वर्षापूर्वीचा आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या शेजाऱ्यांना घराच्या गेटला लावलेला काळा रंग हटवून दुसरा रंग लावण्यासाठी भांडत आहे. काळ्या रंगामुळे आंतरराष्ट्रीय ड्रोन फिरत असतात. त्यामूळे संपूर्ण कॉलनीला याचा धोका आहे, असं ती या व्हिडीओमध्ये बोलताना दिसून येत आहे.