‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आई झाली आहे. बुधवारी १० मे रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर आता गौहर खानने मातृदिनाच्या निमित्ताने एक खास पोस्ट केली आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे म्हणजेच मातृदिन साजरा केला जातो. काल जगभरात मातृदिन साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक कलाकारांनी ‘मदर्स डे’ निमित्त पोस्ट शेअर केल्या आहेत. याच निमित्ताने गौहर खानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा नो मेकअप लूकचा फोटो पोस्ट केला. त्याबरोबर तिने यंदाचा मातृदिन कसा खास होता, याबद्दलही सांगितलं आहे.
आणखी वाचा : प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान झाली आई, पोस्ट करत म्हणाली “आम्हाला आनंदाचा खरा अर्थ…”

गौहर खानची पोस्ट

“आता रात्रीचे १२ वाजले आहेत आणि आई झाल्यानंतरचा माझा पहिल्याच मातृदिनाचा दिवस संपला आहे. आई झाल्यानंतर माझ्या पहिल्या मातृदिनासाठी खास तयार होऊन पोस्ट शेअर करावी असं वाटतं होतं. पण माझ्यात आता ती शक्तीही उरलेली नाही. पण मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांनी माझ्यासाठी हा दिवस खास बनवला.

मी माझ्या मुलाला कुशीत घेणे हीच माझ्यासाठी अल्लाहने दिलेली सर्वोत्तम भेट आहे.मी दरवर्षी माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या सर्व मातांसाठी मातृदिनी पोस्ट लिहित असते. पण माझ्यासाठी मदर्स डे २०२३ ची सर्वात खास गोष्ट म्हणजे माझ्या आईने मला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. बेटा तुला मातृदिनाच्या शुभेच्छा”, असे ती म्हणाली.

आणखी वाचा : Video : “३० सेकंदाच्या कटसाठी…” ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार याने नुकतंच पहिल्या बाळाचे स्वागत केले. गौहर खानने ३९ व्या वर्षी बाळाला जन्म दिला. “आम्हाला मुलगा झाला आहे. सलाम ऊ अलैकुम, या सुंदर जगात तुझे स्वागत, अशी पोस्ट त्यांनी केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauahar khan share first photo after delivered baby said no energy to be glammed up nrp