‘बिग बॉस-७’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसलेले प्रेमी-युगल गौहर खान आणि कुशाल टंडन सध्या दक्षिण अफ्रिकेत ‘खतरों के खिलाडी’ च्या पाचव्या पर्वामध्ये व्यस्त असून, एकमेकांबरोबर काही आनंदाचे क्षण व्यतित करत आहेत. ‘बिग बॉस’ शोच्या दरम्यान या दोघांमध्ये प्रेम फुलले. याच शोमध्ये त्यांनी आपल्यातल्या प्रेमाची जाहीर कबुली देखील दिली. ‘बिग बॉस’ शो संपल्यानंतरदेखील हे दोघे एकमेकांच्या संपर्कात असून, दोघे आनंदात वेळ घालवत असल्याची अनेक छायाचित्रे गौहरने टि्वटरवर प्रसिद्ध केली आहेत. आपण धाडसी नसल्याचे म्हणणारी गौहर खान ‘खतरों के खिलाडी’सारख्या धाडसी गेम शोमध्ये भाग घेतल्याचे कारण सांगताना म्हणते, आव्हानांचा सामना करत आपल्यातील शारीरिक क्षमतेची आणि मानसिक शक्तीची परीक्षा घेण्याची मला उत्सुकता आहे. या सर्वातून पार पडताना सहकार्य करण्यासाठी कुशालसुद्धा या शोमध्ये असल्याने आनंद द्विगुणीत झाला आहे.
गौहर खान आणि कुशाल टंडनशिवाय या शोमध्ये आणखी ११ स्पर्धक आहेत.
Fun times frm Capetown…waterfront pic.twitter.com/tBZppaGoOi
— GAUAHAR KHAN (@GAUAHAR_KHAN) February 10, 2014