देशभरात सध्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जोरदार आंदोलने सुरु आहेत. मुंबई, बंगळूरु, लखनौ आदी शहरांबरोबरच देशात विविध ठिकाणी झालेल्या या आंदोलनांमध्ये सार्वजनिक मालमत्तांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हे नुकसान भरुन काढण्यासाठी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील काही मुस्लिम बांधवांनी तब्बल सहा लाख रुपयांचा चेक तेथील जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त केला. यावरुन बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हिने उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. “झालेल्या नुकसानाची भरपाई घेतली, परंतु हिंसाचारात प्राण गमावल्यांचे काय?” अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाली गौहर खान?

“सार्वजनिक नुकसानाची भरपाई तर सरकारने वसुल करुन घेतली. परंतु हिंसाचारात झालेल्या वैयक्तिक नुकसानाचे काय? त्यांचे काय ज्यांनी आपला जीव गमावला, त्यांचे काय ज्यांचा पैपै साठवून उभारलेला संसार मोडिस निघाला.” अशा आशयाचे ट्विट गौहर खान हिने केले आहे.

‘मालमत्तांचा लिलाव करून सूड घेऊ’

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने करताना हिंसाचार करणाऱ्यांचा सूड घेतला जाईल, अशी कठोर भूमिका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली होती. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांच्या मालमत्तेचा लिलाव करून झालेल्या नुकसानाची वसुली केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

“लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. कायद्याला विरोध करताना काँग्रेस, सपा आणि डाव्या पक्षांनी संपूर्ण देशाला आगीत लोटले. ज्यांनी हिंसाचार घडविला त्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव केला जाईल आणि नुकसानभरपाई वसूल केली जाईल. हिंसाचार करणारे लोक चित्रफितींत आणि सीसीटीव्ही चित्रीकरणात सापडले आहेत. आम्ही त्यांचा सूड घेऊ” असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते.