महाराष्ट्रात करोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसतोय. त्यातच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झालीय. यामुळेच खबरदारी म्हणून प्रत्येकजण काळजी घेताना दिसतोय. बॉलिवूड सिलिब्रिटींमध्ये अभिनेत्री गौहर खान हिला देखील करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यानंतरही ती शूटिंगला पोहचल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. गौहर खानची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याचं तिच्या टीमने म्हंटलं होतं. मात्र तरीही गौहर खानने होम क्वारंटाइन झाली. तिचा क्वारंटाइन काळ पूर्ण झाला असून ती पुन्हा कामाला लागली आहे.

नुकतच गौहरला काही फोटोग्राफर्सनी स्पॉट केलंय. यावेळी गौहर खान पूर्ण काळजी घेताना दिसली. गौहर खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात गौहर खान फोटोग्राफर्सचे हात सॅनिटाईझ करत असल्याचं पाहायला मिळालं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने शेअर केलेल्या व्हिडीओत गौहर खान आधी गाडीचं हॅण्डल आणि सीट सॅनिटाईझ केली. त्यानंतर गौहरने चक्क फोटोग्राफर्सच्या हातावर सॅनिटाईझर स्प्रे मारत त्यांचे हात सॅनिटाईझ केले. यावेळी ती म्हणाली, ” कुठून आलात भावांनो ? कोणत्या कोपऱ्यात लपून उभे होता? खूप गरमी आहे. तुम्ही पहिले सॅनिटाईझर घ्या तुम्ही कुठून कुठून आला असाल.” असं म्हणत तिने सगळ्यांच्या हातावर सॅनिटाईझर दिलं.

सुरक्षित अंतर राखा,काळजी घ्या!
फोटोग्राफर्सनी गौहरला फोटोसाठी मास्क काढण्याची विनंती केली. यावेळी गौहरने मास्क काढलं. यावेळी थोडं दूर थांबा असं ती फोटोग्राफर्सना म्हणाली. तसचं घरीच थांबा असंदेखील ती म्हणाली. गौहरने फोटोग्राफर्सना उन्हात काळजी घेण्याचाही सल्ला दिला. वाढत्या उन्हात फिरताना पाणी पित रहा असा सल्ला तिने फोटोग्राफर्सना यावेळी दिला.
दोन आठवड्यांपूर्वीच बीएमसीने गौहर खान विरोधात एफआरआय दाखल केली होती. करोनाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह येऊनही नियमांच उल्लंघन केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

Story img Loader