गौहर की तनिषा, संग्राम की एजाझ.. या सगळ्या तर्कवितर्काना पूर्णविराम देत ‘बिग बॉस’ने या पर्वाच्या विजेतेपदाचा मान गौहर खानच्या हवाली केला आहे. गौहर खान ही ‘बिग बॉस’च्या अंतिम पर्वाची विजेती ठरली असून तिच्यापाठोपाठ तनिषा प्रथम क्रमांकावर, एजाझ दुसऱ्या क्रमांकावर आणि जो जिंकेल अशी सगळ्यांना अटकळ होती तो संग्राम सिंग तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
‘बिग बॉस’चा अंतिम रंगतदार सोहळा शनिवारी लोणावळ्यातील घरात पार पडला. यावेळी शोचा सूत्रसंचालक सलमान खान याने एली अवरामबरोबर केलेले नृत्य, गौहर-कुशल आणि तनिषा-अरमान या प्रेमी जोडप्यांनी केलेले ‘रोमँटिक अ‍ॅक्ट’ अशा एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांनी या सोहळ्यात रंगत आणली. ‘बिग बॉस’ची विजेती म्हणून गौहरचे नाव जाहीर करताच तिला आश्चर्याचा मोठाच धक्का बसला.

Story img Loader