छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक आहे. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कलाकारांचे अचूक विनोद हे प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. गौरव मोरे हा त्यापैकी एक कलाकार आहे. गौरवला नुकताच भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौरवने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मुलाखतीत गौरवने त्याच्या अभिनयाच्या आवडीबद्दलही सांगितले आहे. “माझा या इंडस्ट्रीमध्ये कुणीही गॉडफादर नाही. पण मला अभिनयाची प्रचंड आवड होती. चित्रपट आणि चित्रपटसृष्टीबद्दल मला प्रचंड आकर्षण होतं. मला माहितीये मी एखाद्या हिरो सारखा दिसत नाही किंवा माझा एखाद्या कलाकारासारखा खास चेहरा देखील नाही, पण मला लोकांचं मनोरंजन करायचं होतं. त्यामुळे मी विनोदी क्षेत्रात काम करायचं ठरवलं आणि खूप मेहनतीनंतर आणि प्रयत्नानंतर मला हास्यजत्रेमध्ये काम मिळालं. मी कधीकाळी फक्त १०० रुपयांवर दिवस काढलेत. माझ्याकडे प्रवासासाठी पैसे नसायचे. ऑडिशन देण्यासाठी पैसे नसायचे. माझ्याकडे फोन नव्हता. कितीतरी वेळाने मी तो छोटासा बटण असणारा फोन घेतला,” असे गौरव म्हणाला.

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

आणखी वाचा : “शूटिंग दरम्यान अनोळखी व्यक्तिने २१ लाख रुपये देऊ केले तर…”, प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

पुढे त्याच्या आयुष्याबद्दल सांगताना गौरव म्हणाला, “मी मुंबईच्या झोपडपट्टी भागात वाढलोय. पवई फिल्टरपाडा या भागात माझं आजवरचं आयुष्य गेलं. त्या जागेने मला आयुष्यातल्या कितीतरी महत्वाच्या गोष्टी शिकवल्या. आयुष्यातली मूल्य शिकवली आणि यामुळेच मी ती जागा कधीही विसरू शकत नाही. आता तर लोकं मला त्याचं जागेच्या नावाने ओळखतात. ती जागा माझ्या आठवणींचा एक भाग आहे. मी अशा ठिकाणी वाढलोय याचा मला अभिमान आहे. लोकप्रियता मिळाल्यावर अनेकजण त्यांचं पूर्वायुष्य विसरून जातात. ते कुठून आलेत याचा त्यांना विसर पडतो, पण मी तसं करणार नाही. मी कितीही मोठा स्टार झालो तरी मी कुठून आलोय त्या जागेच मूळ कधीच विसरणार नाही. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेने मला खूप काही दिलंय आणि त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.”