करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’चा सातवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावतात. करण त्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारत असतो. आता या शोचा बहुचर्चित एपिसोड रिलीज झाला आहे. ज्यामध्ये गौरी खान, महीप कपूर आणि भावना पांडे पाहुण्या म्हणून आल्या आहेत. या शोचा नवीन प्रोमो अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याशी घटस्फोटानंतर लिव्ह-इनमध्ये राहतेय मराठमोळी रेशम टिपणीस; दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली…


प्रोमोमध्ये करण जोहरने गौरीला अनेक प्रश्न विचारले. त्यात ती सुहाना खानला डेटिंगबद्दल कोणता सल्ला देईल आणि शाहरुख खानबरोबरच्या तिच्या लव्ह स्टोरीला कोणत्या चित्रपटाचं नाव समर्पक ठरेल, या प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर शाहरुखची कोणती सवय अजिबात आवडत नाही, याबद्दल गौरीने खुलासा केला.
या कार्यक्रमात गौरीने शाहरुखबद्दल आणि पाहुण्यांना गाडीपर्यंत निरोप देण्याच्या त्याच्या सवयीबद्दल सांगितले आहे. गौरी म्हणाली की, “त्याच्या या सवयीमुळे पार्टी ‘मन्नत’च्या आत होण्याऐवजी बाहेर होत आहे, असे वाटते. तो नेहमी पाहुण्यांना त्यांच्या कारपर्यंत सोडून येतो. कधीकधी तो पार्टीमध्ये कमी आणि बाहेरच जास्त वेळ घालवतो. त्यामुळे त्याला अनेकदा शोधावे लागते.”

हेही वाचा – टीव्हीवरील ‘या’ दोन लोकप्रिय सूना बिग बॉसमध्ये दिसणार? समोर आली महत्वाची माहिती


सुहानासाठी डेटिंगबद्दल काय सल्ला काय देशील, असा प्रश्न करणने गौरीला विचारला. तेव्हा गौरीने “एकाच वेळी दोनपेक्षा जास्त लोकांना डेट करू नको,” असा सल्ला सुहानाला दिला. याचवेळी महीपला पडद्यावर कोणत्या अभिनेत्याबरोबर काम करायला आवडेल, असा प्रश्न करणने विचारला त्यावर महीपने हृतिक रोशनचं नाव घेतलं. करणने पुन्हा गौरीला तिच्या आणि शाहरुखच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारलं. तिच्या आणि शाहरुखच्या लव्ह स्टोरीला साजेसं चित्रपटाचं नाव करणने विचारताच ती म्हणाली, “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. मला तो चित्रपट खूप आवडला.”


दरम्यान, यापूर्वी गौरी खान रिअॅलिटी शो, द फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज विथ महीप कपूर, भावना पांडे, नीलम कोठारी आणि सीमा खानमध्ये दिसली होती.

Story img Loader