बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खान यांनी शनिवारी एकत्र पार्टी केली. काही दिवसांपूर्वी शाहरुख आणि करण यांच्यात किरकोळ भांडण झाल्याची चर्चा होती. यानंतर आता करणने गौरी खान, डिझायनर नंदिता महतानी, माहीप कपूर, अनू दिवान आणि भावना पांडे यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे.

 

या छायाचित्रात गौरी खान मजामस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. नुकतंच शाहरुख आणि करण जोहर यांच्या मैत्रीसंबंधांमध्ये खटके उडल्याची चर्चा होती. कॉफी विथ करणच्या आधीच्या सर्व पर्वांची सुरुवात करणा-या शाहरुखने या पर्वात हजेरी लावणे टाळले. कारण, सलमान खानने कॉफी विथ करणच्या या सिझनची सुरुवात केली होती. इफ्तार पार्टीतील मनोमिलनानंतरही या दोन्ही खानांमधील शत्रूत्वाचे वादळ अद्याप शांत झालेले नाही, असेच वाटते.

Story img Loader