बॉलिवूडमधील तारे-तारकांची चंदेरी दुनिया जशी झगमगाटाने भरलेली असते, त्याचप्रमाणे त्यांच्या पार्ट्यादेखील रंगारंग असतात. अशीच एक पार्टी सुपरस्टार शाहरूख खानची पत्नी गौरी खान आणि बॉलिवूड चित्रपटकर्ता करण जोहरने मागील आठवड्यात शनिवारी रात्री साजरी केली. सध्या करण जोहर आणि शाहरूखमध्ये काहीतरी बिनसले असल्याच्या बातम्या येत असतानाच करण जोहरने गौरी खान, डिझायनर नंदिता मथानी, महीप कपूर, अनू दिवाण आणि भवन पांडे यांच्याबरोबरचे स्वत:चे छायाचित्र टि्वटरवर प्रसिद्ध केले आहे. अलिकडेच शाहरूख खान आणि करण जोहरमध्ये बिनसल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या, परंतु, हे छायाचित्र काहीतरी वेगळेच सांगते.



‘कॉफी विथ करण’च्या यावेळच्या शोचा प्रारंभ अभिनेता सलमान खानच्या मुलाखतीने झाला असल्या कारणाने या शोच्या मागील सर्व सत्रांमध्ये उपस्थिती लावलेला शाहरूख खान यावेळच्या शोमध्ये येणार नसल्याचे समजते. ‘कॉफी विथ करण’ शोच्या याआधीच्या सर्व सत्रांमध्ये उपस्थित असलेल्या शाहरूखने पहिल्या दोन सत्रांच्या सुरूवातीच्या भागामध्ये उपस्थिती लावली होती, तर तिसऱ्या सत्रात तो एकटाच आला होता. यावेळच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या चौथ्या सत्राची सुरूवात मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झाली. यावेळी सुरूवातीच्या भागात सलमान खानने उपस्थिती लावली. एका इफ्तार पार्टीत या दोन बड्या कलाकारांनी एकमेकांना दिलेले अलिंगन फार प्रसिद्ध झाले असले तरी त्यांच्यातील दुरावा अजून सरला नसल्याचेच जाणवते.

Story img Loader