सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींपेक्षा प्रसार माध्यमांचे लक्ष्य वेधले आहे ते त्यांच्या चिमुरड्यांनी. यामधील एक ‘सेलिब्रेटी किड’ म्हणजे अब्राम शाहरुख खान. काही दिवसांपूर्वीच गौरी आणि अब्रामचे एक छानसे छायाचित्र प्रदर्शित झाले होते. त्यानंतर आता या मायलेकाचे आणखीन एक छायाचित्र प्रदर्शित झाले आहे.
gauriabram-khan
गौरीने मोनीषा जयसिंगने डिझाइन केलेला गाऊन यावेळी परिधान केला होता. आपल्या आईचे बोट धरून चालताना चिमुरडा अब्राम सदर छायाचित्रात दिसत आहे. सचिन जोशीच्या रेसॉर्ट उदघाटनला शाहरुख आणि गौरी गेले होते. त्यावेळी त्यांनी ही छायाचित्रे काढली होती.
gaurikhan-abram-embed
गौरी आणि शाहरुख हे सध्या आपल्या छोट्या मुलासह वेळ घालवण्याची संधी दवडू देत नाहीएत.
srk-abram-embed
गोव्यातील समुद्रकिनारी वाळूसोबत खेळताना अब्राम आणि त्याचे हे खेळ मन लावून बघताना शाहरुख या छायाचित्रात दिसत आहे.

Story img Loader