बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान इंडस्ट्रीतील सर्वात रोमँटिक अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध आहे. पण या रोमान्सच्या बादशाहच्या हृदयावर राज्य करणारी राणी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची पत्नी गौरी खान आहे. वयाच्या १८ व्या वर्षी शाहरुख खान गौरीच्या प्रेमात पडला होता. गौरीच्या प्रेमात तो एवढा बुडाला होता की त्याने तिच्यासाठी हातात पैसे नसतानाही मुंबई गाठली होती. गौरी मुंबईमध्ये कुठे आहे याची काहीच माहिती नसताना त्याने तिला शोधून काढलं होतं. प्रेमात बरेच चढ-उतार पहिल्यानंतर १९९१ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं आणि आता हे तीन मुलांचे आई- वडील आहेत.
शाहरुख खानची पत्नी गौरी खानने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण १’मध्ये हजेरी लावली होती. या शोच्या एका सेगमेंटमध्ये गौरी खानने तिच्या जलसीबाबत भाष्य केलं होतं. जेव्हा तिला कोणी शाहरुखला लग्नासाठी दुसरी कोणीतरी भेटल्यास तिची प्रतिक्रिया काय असेल? असा प्रश्न विचारतात तिला काय वाटतं यावर ती बोलली होती. करण जोहरने गौरीला हाच प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना गौरी म्हणाली होती, “खरं तर सर्वात आधी मला हा प्रश्न जो कोणी विचारतो त्याचा खूप राग येतो. मी नेहमीच देवाकडे प्रार्थना करते की, जर शाहरुखला अशी कोणी भेटली तर ती माझ्यापेक्षा उत्कृष्ट असावी आणि दिसायलाही सुंदर असायला हवी.”
आणखी वाचा- बिग बॉस मराठीचं चौथं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, महेश मांजरेकर यांचा व्हिडीओ चर्चेत
दरम्यान काही वर्षांपूर्वी शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. या दोघांनी ‘डॉन’ आणि ‘डॉन २’मध्ये एकत्र काम केलं होतं आणि याच चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यातील जवळीक वाढल्याचं बोललं गेलं होतं. अर्थात गौरी खान पतीच्या या नात्याबाबत अजिबात खुश नव्हती. गौरी खानने त्यावेळी शाहरुख खानला पुन्हा कधीच प्रियांकासोबत काम न करण्याची सक्त ताकीद दिली होती असंही बोललं जातं.
आणखी वाचा- “शाहरुख खान तू शेवटचा सुपरस्टार नाहीस…” विजय देवरकोंडाचे ‘ते’ वक्तव्य पुन्हा चर्चेत
शाहरुख खानने एका मुलाखतीत त्याच्या आणि गौरी खानच्या नात्यावर भाष्य केलं होतं. शाहरुखसाठी चित्रपट किती महत्त्वाचे आहेत हे तर सर्वांनाच माहीत आहेत. मात्र जेव्हा या मुलाखतीत त्याला, ‘चित्रपट करिअर आणि पत्नी गौरी यातील एकच गोष्ट निवडायची झाल्यास तू काय निवडशील?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखने, ‘गौरीसाठी मी कधीही करिअर सोडून द्यायला तयार आहे.” असं उत्तर दिलं होतं.