बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर महिनाभराने त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. यात आर्यन खानला दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे खान कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर अखेर गौरी खान ही सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. नुकतंच तिने एक पोस्ट शेअर केली असून सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौरी खान हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. गौरी खान ही एक इंटिरियर डिझायनर आहे. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केले आहे. तिचे हे रिल फॅशन डिझायनर्स फाल्गुनी आणि शेन पीकॉकसोबत शेअर केले आहे. हे शेअर करतेवेळी तिने त्याला एक कॅप्शनही दिली आहे.

“एक सहयोग… जिथे डिझाईन फॅशनशी जुळते. ड्रीम टीम फाल्गुनी आणि शेनसह हैदराबादमधील नवीन स्टोअर. नवीन डिझाईन्स, नवीन शहर, टीम मात्र तीच…. मी फारच उत्साही आहे. या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती शेअर करण्यासाठी मी प्रतिक्षा करु शकत नाही,” अशा आशयाचे कॅप्शन गौरी खानने दिले आहे. या व्हिडीओमध्ये तिने अनेकांना टॅग केले आहे.

गौरी खानची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहे. यात काही नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर पुन्हा सक्रीय झाल्याबद्दल तिचे स्वागत केले आहे. तर काहींनी ‘शाहरुखची काळजी घे’, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, जामिनाच्या अटींमध्ये दिली सूट!

दरम्यान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी जामिनावर सुटका करतेवेळी आर्यन खानला काही बंधन घालण्यात आले होते. यात दर शुक्रवारी आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचं बंधन जामिनातील अट म्हणून घालण्यात आली होतं. आता त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला सूट दिली आहे. यामुळे दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्यन खाननं न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या नियमातून आर्यन खानला सूट देण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली एसआयटीनं ज्या ज्या वेळी आर्यन खानला चौकशीसाठी पाचारण केलं, त्या त्या वेळी त्याला चौकशीसाठी हजर व्हावं लागेल, अशी अट न्यायालयानं घालून दिली आहे. त्यासोबतच आर्यन खानला मुंबईतून बाहेर जायचं असेल, तर त्यासाठी तपास अधिकाऱ्यांना माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauri khan shares first instagram post after aryan khan bail welcome back queen say fans nrp
Show comments