राज्यातील प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून ओळखली जाणारी गौतमी पाटील सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आपल्या डान्सने सर्वांना वेड लावणाऱ्या गौतमीचे लाखो चाहते आहे. सोशल मीडियावर तिचे डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज (रविवार, १२ नोव्हेंबर) गौतमी पाटीलने दिवाळी पहाट निमित्त ठाण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आज दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमानंतर गौतमीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ठाणेकरांचं प्रेम कसं वाटलं? असा प्रश्न विचारला असता गौतमी पाटीलने खास उत्तर दिलं आहे. तिने स्मितहास्य करत “एक नंबर” असं उत्तर दिलं आहे.

हेही वाचा- “दिल तो बच्चा है जी!” चिमुकलीसह खेळणाऱ्या गौतमी पाटीलचा गोंडस व्हिडीओ पाहिला का?

ठाण्यातील कार्यक्रमाबद्दल विचारलं असता गौतमी पाटील पुढे म्हणाली, “मला खूप छान वाटलं, मी नेहमी म्हणत असते की, मुंबईचे प्रेक्षक मला खूप आवडतात. मला नेहमी त्यांचं प्रेम मिळतं. सगळेजण पाच-सहा वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी येऊन थांबले होते. त्यामुळे खूप छान वाटलं. तुम्हाला आणि सर्व प्रेक्षक वर्गाला, महिला वर्गाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.”