महाराष्ट्राला आपल्या दिलखेच अदा आणि नृत्यामुळे वेड लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. तिच्या अदा-नृत्याचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. म्हणून तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होतं असते. आता गौतमी सोशल मीडियावर देखील अधिक सक्रिय झाली असते. तिचे फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होतं असतात. सध्या तिच्या एका व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतमी पाटीलनं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पांढऱ्या साडीत दिसत आहे. यात ती अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. आपल्या अनोख्या अंदाजात गौतमीनं ‘अंगारों’ गाण्यावर डान्स केला आहे.

हेही वाचा – अखेर मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’चा ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम ‘या’ तारखेपासून होणार सुरू

गौतमीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहे. “ट्रेंडचा शेवट केला”, “१०० तोफांची सलामी तुम्हाला गौतमी”, “कडक”, “खल्लास”, “जबरदस्त”, “पुष्पा ३ चित्रपटाची हीरोईन”, “सबसे कातील गौतमी पाटील म्हणतात ते खरंच आहे”, “सबसे हटके”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी गौतमी पाटीलच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – शरद पवार आणि ‘झपाटलेला’ चित्रपटाचं आहे खास कनेक्शन, महेश कोठारेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाणं प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने गायलं आहे. तर रकीब आलम यांनी लिहिलं असून देवी श्री प्रसादने संगीतबद्ध केलं आहे. तसंच ‘अंगारों’ गाण्याचं नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे

हेही वाचा – Video: “आनंदी कुठे गेली?”, ‘मन धागा धागा जोडते नवा’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, मालिका घेणार ६ वर्षांचा लीप

गौतमी पाटीलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती आता चित्रपट, अल्बम साँगमध्ये काम करताना दिसत आहे. अलीकडेच तिचं ‘आलं बाई दाजी माझ’ गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यात गौतमी गायक, संगीतकार, अभिनेता उत्कर्ष शिंदेंबरोबर झळकली होती. आतापर्यंत युट्यूबवर या गाण्याला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil dance on angaaron song of pushpa 2 the rule movie video viral pps