प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री निधन झालं. काही दिवसांपूर्वी तिचे वडील बेवारस अवस्थेत सापडले होते. गेल्या २० वर्षांपासून गौतमीचे वडील कुटुंबापासून वेगळे राहत होते. अखेर गौतमीने त्यांची जबाबदारी स्वीकारली आणि धनकवडीतील स्मशानभूमीत रविंद्र पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “रक्त उसळलंय…”, जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावर प्राजक्ता गायकवाडची संतप्त पोस्ट, म्हणाली…

गौतमीचं नृत्य आणि तिच्या आडनावावरून मध्यंतरी वाद सुरु झाले असताना तिचे वडील माध्यमांमध्ये झळकले होते. मुलीबरोबर राहत नसतानाही वडिलांनी तिच्या डान्सबाबत आणि आडनावाबाबत प्रतिक्रिया दिली होती. वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील म्हणाले होते, “कौटुंबिक वादातून आम्ही विभक्त झालो. तेव्हापासून गौतमी आणि तिची वेगळे राहतात. माझ्या घरी टीव्ही नसल्यामुळे मी तिचा डान्स दुसऱ्यांच्या फोनमध्ये पाहिला आहे. तिचा डान्स आवडतो, पण थोडं वाईटही वाटतं.”

हेही वाचा : ‘हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासह शेअर केलेला फोटो चर्चेत, नेटकरी म्हणाले…

माध्यमांशी संवाद साधताना गौतमीच्या वडिलांनी मुलीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. “टीका करण्याऱ्यांनी तिला अशा पद्धतीने बोलायला नको. मी तिच्या बाजूने आहे. ती काही वाईट करतेय का? टीका करणारे लोक भरपूर असतात. कुणी घोड्यावर बसू नको म्हणतात, तर कुणी पायी चालू नको म्हणतात. लोक काही ना काही बोलतच असतात.” असं स्पष्ट उत्तर देत रविंद्र पाटील यांनी गौतमीवर टीका करणाऱ्यांना सुनावलं होतं.

हेही वाचा : “पेइंग गेस्ट, भाड्याचं घर ते स्वतःचं घर”, ‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंताने मुंबईत घेतलं हक्काचं घर; पाहा फोटो

लेकीच्या डान्सबद्दल त्यांना काहीच आक्षेप नव्हता. तसेच गौतमीच्या आडनावाबद्दल बोलताना ते म्हणाले होते, “ती पाटील आहे, तर पाटीलच आडनाव लावणार. त्यामुळे तिने आडनाव बदलायचा प्रश्नच नाही.” यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही मुलीला दिला होता. दरम्यान, आपल्या वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी गौतमी पुण्यात पोहचली होती. यावेळी ती भावुक झाली होती. अंतिम दर्शन घेत तिने वडिलांना शेवटचा निरोप दिला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil father ravindra patil passed away in pune hospital sva 00