प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात.

२०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच गौतमी तिच्या चाहत्यांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ किंवा २ जानेवारीला गौतमी नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. गौतमीच्या ‘सरकार’, ‘आणा की शेठ’ या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं होतं. आता तिच्या नव्या गाण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

हेही वाचा>> कॅप्टन्सी टास्कदरम्यान सदस्यांनी गमावले तब्बल १७ लाख; ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणार फक्त ‘इतकी’ रक्कम

गौतमीच्या लावणी कार्यक्रमात डान्स बघायला आलेल्या प्रेक्षकाचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व प्रकारांमुळेच आता गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. याबाबत गौतमीने तिची स्पष्ट भूमिका मांडली. लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणीवर गौतमीने ‘टीव्ही९ मराठी’ वृत्तवाहिनीला तिची प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने नवीन गाणं व मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं.

हेही वाचा>> Video:…अन् नातवांसाठी मुकेश अंबानी झाले ड्रायव्हर; ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचीही व्हिडीओत दिसली झलक

हेही वाचा>> “मी कार्यक्रम बंद करणार नाही कारण…”, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका

लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचे लावणी कार्यक्रमातील अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विभत्स हावभाव व भर कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून लावणी डान्स करतानाचा तिचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता.

Story img Loader