लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. तिचं नृत्य पाहिल्यानंतर सोशल मीडियावर गौतमीला बरंच ट्रोल करण्यात आलं. अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी अशी चर्चा होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : उकळतं पाणी अंगावर फेकल्यानंतरही अर्चना गौतमने विकासचा बाप काढला, कुत्र्याशी केली तुलना, भांडणात अंगावर धावून गेले अन्…

कार्यक्रमावर बंदी घालण्याबाबत गौतमीने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. ‘साम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली, “मी सध्या तरी काही चुकत नाही. माझा कोणताच अश्लीलपणाही सुरू नाही. सध्या सगळं सुरळीत सुरू आहे.”

“मागे जे काही घडलं त्याबाबत मी माफी मागितली. त्यानंतर माझ्या साडीचा पदर नीट असतो. पायात घुंगरू, माझे केसही मोकळे नसतात. काही चूक नसतानाही माझ्या शोला बंदी घालायची का? मी काही चुकतेय का? तर मला तुम्ही बोला. पण चूक नसताना माझ्या कार्यक्रमावर बंदी का?”

आणखी वाचा – Tunisha Sharma Suicide : धर्म आणि वय नाही तर ‘या’ कारणामुळे केलं तुनिषाशी ब्रेकअप, शिझानचा पोलिसांसमोर खुलासा

चुकत नाही तर थांबणार नाही असं गौतमीचं सध्या मत आहे. गौतमीच्या ‘सरकार’, ‘आणा की शेठ’ या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं होतं. २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच गौतमीचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil on her show says i am noy wrong see details kmd