‘सरकार’, ‘आणा की शेठ’ या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावणारी गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. गौतमीच्या कार्यक्रमांना चाहते गर्दी करतात. गौतमीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता.

गौतमीने नुकतंच साम टीव्ही वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत गौतमीने कार्यक्रमाबाबतची तिची भूमिका स्पष्ट केली आहे. गौतमी म्हणाली, “पूर्वी माझ्याकडून चूक झाली, हे मी मान्य करते. पण तेव्हापासून माझा पदर नीट असतो, मी केस मोकळे सोडत नाही. मी काहीही अश्लील डान्स करत नाही. त्यामुळे आता माझ्या कार्यक्रमांबद्दल आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही”.

mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Vishwas Nangare Patil told amazing poem of Suresh Bhat
Video : “कधीही हरल्यासारखे वाटेल तेव्हा हे ऐका” विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता
Loksatta readers reactions on lokrang article
पडसाद : दबंग, पण सहृदयी अधिकारी
loksatta readers reaction on chaturang articles
पडसाद : बुरसटलेपण कधी कमी होणार?
dilip walse patil remarks on dhananjay munde resignation
वळसे पाटलांकडून मुंडेंची पाठराखण; मुंडेंच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याची भूमिका
dr baba adhav warns agitation for mulshi dam victims
मुळशी धरणग्रस्तांसाठी पुन्हा कारागृहात जाऊ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांचा इशारा
Prime Minister Narendra Modi statement regarding Washim
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले वाशीमचे कौतुक; “माझ्यासह सगळ्याच भारतीयांना आनंद…”

हेही वाचा>> “माझा लावणीचा कार्यक्रम नसून डीजे…”, गौतमी पाटीलने दिलं स्पष्टीकरण

हेही वाचा>> ‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट निर्मात्यांची घोषणा

“लोकांना आवडतं म्हणून ते माझ्या कार्यक्रमाला येतात. महिलाही माझे कार्यक्रम बघण्यासाठी येतात. माझ्याबरोबर त्या ठेका धरतात, हे पाहून मला आनंद होतो”, असंही पुढे गौतमी म्हणाली. गौतमी नवीन वर्षात एक नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच तिचं लावणीचं हे गाणं प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा>>“प्लीज तुनिषाला वाचवा” असं म्हणत रुग्णालयात शीझान खान रडत होता, डॉक्टरांचा खुलासा

लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचे लावणी कार्यक्रमातील अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विभत्स हावभाव व भर कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून लावणी डान्स करतानाचा तिचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता.

Story img Loader