महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गौतमी पाटील हे नाव पोहचलं आहे. गौतमी पाटीलवर लावणी सादर करताना अश्लील हावभाव करत असल्याचा आरोप करण्यात येतो. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट इशारा दिला होता. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्सचा प्रकार होत असेल, तर हा मुद्दा अधिवेशनात मांडणार, असा अजित पवार यांनी म्हटलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांच्या विधानानंतर गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. “दादा खूप मोठे आहे. त्यांच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मला एकच म्हणायचं आहे की, कुठं चुकत आहे. चुकलेल्या ठिकाणी माफी मागितली आहे. तिथून पुढे माझ्याकडून कोणतीही चुक झाली नाही. तरीही मलाच का ट्रोल केलं जातं?,” असा सवाल गौतमी पाटीलने व्यक्त केला आहे.

“बऱ्याच मुली या क्षेत्रात आहेत, त्यांच्याकडेही पाहा, फक्त गौतमी पाटीलला का ट्रोल केलं जात? प्रेक्षकांचं प्रेम असल्याने कार्यक्रम पाहण्यास येतात. मग, प्रेक्षकांना माझा कार्यक्रम पाहण्यासाठी येऊ नये, असं सांगू का? तसेच, कोणत्याही कार्यक्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, तर शो-बंद केला जातो,” असं गौतमी पाटीलने सांगितलं आहे.

हेही वाचा : “मला तुझा अभिमान…” विजेतेपद हुकल्यानंतर शिव ठाकरेसाठी अभिजित केळकरने केलेली पोस्ट चर्चेत

अजित पवार काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याचं एका बैठकीत अजित पवारांच्या निदर्शनास आलं होतं. यावरून अजित पवार चांगलेच संतापले होते. “हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणार आहे. महाराष्ट्राची लावणी परंपरा आहे. पण ते कार्यक्रम सर्वांना पाहता येतील, अशाप्रकारे आयोजित केले पाहिजे. त्यामध्ये कोणताही अश्लील प्रकार होता कामा नये. दुर्दैवाने मला काल अशी माहिती मिळाली की, काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांवर बंदी आहे. पण काही जिल्ह्यांत ते चालू आहे.”

हेही वाचा : अमरावती कुठे आहे? हे लोकांना सांगावं लागत असल्याची शिव ठाकरेला खंत; म्हणाला, “मी जिथून आलो…”

“हा प्रकार नेमका काय आहे? याबाबत मी संबंधितांशी बोलणार आहे. वेळ पडली तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारचे कार्यक्रम घडता कामा नयेत. महाराष्ट्राची उच्च परंपरा आहे. पहिल्यापासून आपल्या वडिलधाऱ्यांनी ही परंपरा चालवत आणली आहे. ती परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळे कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे,” असा थेट इशारा अजित पवारांनी दिला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil react on ajit pawar warn lavani issue assembly session ssa
Show comments