नुकताच नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या आडनावावरून वाद झाला. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली होती. त्यानंतर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गौतमीचा डान्स व पाटील आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया दिली होती. सुरुवातीला त्यांनी तिला संरक्षण द्यायला हवं, असं म्हटलं होतं. पण नंतर मात्र त्यांनी वक्तव्यावरून माघार घेतली होती. संपूर्ण प्रकरणाबद्दल गौतमी पाटीलला विचारण्यात आलं. त्यावर तिने काय प्रतिक्रिया दिली ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – “मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”

संभाजीराजे नेमकं काय म्हणाले होते?

“छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं. त्यामुळेच महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे राज्य वेगळं आहे ते यामुळेच. म्हणूनच सर्वांनी गौतमी पाटील यांच्यामागे उभं राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालंच पाहिजे मी याच मताचा आहे,” असं संभाजीराजे म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून माघार घेतली. एक ट्वीट करून “अशा कलेला नको रे बाबा संरक्षण” असं ते म्हणाले.

हेही वाचा – गौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय?

गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

“खरं तर, मला याबद्दल माहीत नाही. त्यामुळे त्याबद्दल माहिती घेतल्यावर मी बोलेन. पण, पण दादांच्या बाबतीत नो कॉमेंट्स. दादा काहीही म्हणाले तरी मी त्यावर काहीच बोलू शकत नाही. मी त्यांना मानते. बरेच लोक माझा कार्यक्रम बघायला येतात. जर मी अश्लील कृत्य करत असते तर इथे कार्यक्रम करूच शकले नसते,” असं गौतमी पाटील ‘टीव्ही ९’ शी बोलताना म्हणाली.

यावेळी गौतमी पाटीलने घनश्याम दरोडेने केलेल्या आरोपांनाही सडेतोड उत्तर दिलं. तसेच कार्यक्रमांमध्ये गोंधळ किंवा दंगल झाल्यानंतर आयोजकांवर गुन्हे दाखल होतात, त्याबद्दलही तिने स्पष्टीकरण दिलं.

Story img Loader