राज्यात आपल्या डान्समुळे आणि कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळामुळे चर्चेत राहणारं नाव म्हणजे गौतमी पाटील होय. अलीकडेच कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत तिचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. गौतमी बऱ्याच वर्षांपासून डान्स करतेय, पण अलीकडे ती खूपच चर्चेत असते. राज्यातील बऱ्याच भागात तिचे कार्यक्रम होतात. या यशाचं श्रेय कुणाला देशील असं विचारल्यावर गौतमी काय म्हणाली? जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

“या यशाचं श्रेय मी वडिलांना देणार. ते व्यवस्थित असते तर मी डान्सच्या क्षेत्रात आले नसते, इथपर्यंत पोहोचले नसते. त्यामुळे मी वडिलांना व आईला श्रेय देईन. कोणत्याही मुलीला वडील असले तर ते मुलीसाठी काहीही करू शकतात. आमच्या समाजात पाटील आपल्या मुलीला कधीच डान्सच्या क्षेत्रात येऊ देणार नाही,” असं गौतमी पाटील ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

“तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली…

“वडिलांमुळेच मी या क्षेत्रात आले, ते व्यवस्थित असते तर माझं लग्न लावून दिलं असतं आणि माझ्या हातात आता एखादं बाळ असतं,” असं गौतमी पाटील म्हणाली. दरम्यान, गौतमी पाटीलच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. ते धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते, त्यानंतर गौतमीने त्यांना पुण्यात उपचारासाठी आणलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil says she would have been married if her father had good gave success credit to him hrc
Show comments