डान्सर गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर गौतमीचे चाहते आहे. राज्यातील विविध भागांत अनेक कार्यक्रमानिमित्त तिचे डान्स शो आयोजित केले जातात. गौतमीच्या कार्यक्रमाला हजारो चाहते गर्दी करत असतात. अनेकदा तिच्या कार्यक्रमात तरुणांनी धुडगूस घातल्याचंही समोर आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणीतरी लूपन हा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून गौतमी व्हॅनिटी व्हॅन वापरते. याबाबत तिने एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा>> Video: राघव चड्ढाबरोबर लग्नाच्या चर्चांदरम्यान लंडनला निघाली परिणीता चोप्रा, लाजत म्हणाली “मी…”

गौतमी म्हणाली, “व्हॅनिटी व्हॅनचं पाहिजे असं माझं काही नाही. मी आधी पडद्याच्या रुममध्येही कपडे बदलले आहेत. पण माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी काळजी घेते. म्हणून मी व्हॅनिटी व्हॅन वापरायला सुरुवात केली. त्यानंतर मी व्हॅनिटी व्हॅन असली पाहिजे, असं आयोजकांना सांगते. पण, जर व्हॅनिटी व्हॅन शक्य नसेल, तर चार भिंती असलेली व्यवस्थित रुम द्या, एवढंच माझं म्हणणं असतं.”

हेही वाचा>> एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? रॅपिड फायर प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाली, “मला…”

गौतमी पाटीलच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमीच्या डान्सवर आक्षेप घेत ती अश्लील डान्स करत असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. त्यानंतर डान्समध्ये सुधारणा केल्याचं गौतमीचं म्हणणं आहे.